Advertisement Advertisement

CRIME NEWS :“प्रेमाचं नातं थेट खूनापर्यंत! सिंदखेडराजाच्या संस्कृतीचा नाशिकच्या जंगलात मृतदेह, १९ वर्षांचा अथर्व अटकेत…!खुनाची आधीच तयारी?

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):सिंदखेडराजा तालुक्यातील संस्कृती काळे या तरुणीच्या हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अकोल्यात शिक्षण घेत असलेली संस्कृती अचानक बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील सारूळजवळच्या जंगलात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

राज्यभरातील बेपत्ता मुलींची माहिती तपासत असताना अकोल्यात मिसिंग दाखल असलेल्या संस्कृतीच्या कुटुंबीयांना नाशिकला बोलावण्यात आलं. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवताच हा प्रकार खुनाचा असल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणी पोलिसांनी दुसरबीड येथील १९ वर्षीय अथर्व देशमुख याच्यासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अथर्व आणि संस्कृती यांच्या कुटुंबीयांत पूर्वीपासून ओळख होती. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते. कुटुंबीयांना याची माहिती झाल्यानंतर संस्कृतीला पुढील शिक्षणासाठी अकोल्याला तर अथर्वला नाशिकला पाठवण्यात आलं होतं. मात्र दोघेही फोनवरून संपर्कात होते.

१९ फेब्रुवारी रोजी अथर्व अचानक अकोल्यात पोहोचला. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संस्कृती, अथर्व आणि त्याचे दोन मित्र अकोल्यातील एका कॅफेत भेटले. काही वेळाने चौघेही कारने बाहेर पडले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती पुढे आली आहे.

यानंतर संस्कृती बेपत्ता झाली आणि काही दिवसांनी तिचा मृतदेह नाशिक परिसरात आढळला. कुटुंबीयांच्या संशयानंतर पोलिसांनी जाळं टाकत अथर्वला ताब्यात घेतलं. चौकशीतून खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती आहे.

खुनाची आधीच तयारी?

दरम्यान या प्रकरणात आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अर्थवने सांगितल्याप्रमाणे कानाखाली मारण्याचा राग, चरित्राचा संशय यावरून हा खून झाल्याचे समोर येत आहे. मात्र संस्कृतीचा खून करायचा हे ठरवूनच अर्थव अकोल्यात गेला होता का? या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत. कारण हा सगळ्या प्रकार कारमध्ये घडला, त्यावेळी आधीच अर्थवने चाकू का आणून ठेवला? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

या घटनेमुळे सिंदखेडराजा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून कठोर शिक्षेची मागणी होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!