जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न….

जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. शेणफडरावजी घुबे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून देऊळगाव घुबे येथील रामचंद्र आश्रमाचे ब्रह्मचारी विनोद महाराज, तर विशेष उपस्थिती म्हणून इसरूळ नगरीचे माजी सरपंच श्री. संतोषजी भुतेकर व प्राचार्य हरिदासजी घुबे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. या शाळेने केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर जीवनासाठी आवश्यक संस्कार, आत्मविश्वास, कला व क्रीडा गुणांना वाव दिल्याचे विद्यार्थ्यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. शेणफडरावजी घुबे यांनी विद्यार्थ्यांनी शाळेतून घेतलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगात आणून सुज्ञ व जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन केले. विद्यार्थी हा आयुष्यभर आपल्या शाळेसाठी व शिक्षकांसाठी विद्यार्थीच असतो, असे मत त्यांनी मांडले.

माजी सरपंच श्री. संतोषजी भुतेकर यांनी समाजातील अनुभव कथन करताना आत्मविश्वास हा विद्यार्थ्यांचा खरा मित्र असल्याचे सांगितले. राजकारणापासून अंतर ठेवून माणूस म्हणून घडण्याचा सल्ला देत त्यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.

ब्रह्मचारी विनोद महाराज यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार विषय निवडून त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे, असे मार्गदर्शन केले. केवळ जास्त गुण मिळवणारेच नव्हे, तर कमी गुण मिळवणारे विद्यार्थीही जीवनात मोठे यश मिळवू शकतात, अशी प्रेरणादायी उदाहरणे त्यांनी दिली.प्राचार्य हरिदास घुबे सर यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षांचे गांभीर्य समजावून सांगत, भविष्यात अडचणी आल्यास शिक्षक नेहमीच सहकार्य करतील, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी जाट व साक्षी घुबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. उद्धव घुबे सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत, शाळेतून मिळालेल्या संस्काररूपी शिदोरीचा उपयोग आयुष्यात करावा, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. लक्ष्मण घुबे सर, सावंत सर, लांडगे सर, गुंजकर सर, लहाने सर, प्रा. गजानन मिसाळ, प्रा. संतोष मिसाळ, प्रा. अमोल डुकरे, प्रा. विष्णू आंबस्कर, प्रा. प्रमोद चव्हाण, प्रा. दिलीप सर, प्रा. दिगंबर सर, प्राध्यापिका पूनम मॅडम, पडोळे मॅडम, कराडे सर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!