खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज)
खामगाव तालुक्यातील गोंधनापूर गावात एका १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. १५) दुपारी उघडकीस आली. हरिओम प्रवीण डवंगे (वय १९) असं मृत तरुणाचं नाव आहे.
माहितीनुसार, हरिओमची आई शेतमजुरी करून दुपारी घरी परतली असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं तिच्या लक्षात आलं. संशय आल्याने तिनं खिडकीतून आत डोकावून पाहिलं असता हरिओम मृत अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी आकाश विक्रम डवंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंधनापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.














