लग्नाचे आमिष दाखवत तिचे फोटो काढून तिला…! कधी त्याच्या घरात तर कधी त्याच्या कारमध्ये वारंवार…

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल – शेगावची घटना

गडचिरोली (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गडचिरोलीतील देसाईगंज येथील सराफा व्यापारी आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्यांची नावे सुनील पुंडलिक बोके (वय ४८, रा. गांधी वॉर्ड, देसाईगंज) आणि अक्षय कुंदनवार (वय ३२, रा. मधुबन कॉलनी, देसाईगंज) अशी आहेत.

२३ वर्षीय तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुनील बोके याने ऑगस्ट २०२४ पासून २६ जून २०२५ पर्यंत लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत घरात व कारमध्ये वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणीवर दबाव आणला. बोकेचा सहकारी अक्षय कुंदनवार हा वारंवार फोन करून तरुणीला त्याच्याकडे भेटायला भाग पाडत असे.

१७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी नागपूर येथे सुनील बोकेला, तर देसाईगंजातून अक्षय कुंदनवारला अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

या प्रकरणात तरुणी पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती मिळताच शहरातील एका वादग्रस्त राजकीय नेत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने धैर्य दाखवत ठामपणे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनीही तिला पूर्ण साथ दिली, त्यामुळे नेत्याचा प्रयत्न फसला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!