“बबनराव तुम्ही ‘लोणीकर ‘पण मी ‘तुपकर’ याद राखा..; लोणीकरला शेतकऱ्यांनी बुटानं हाणला पाहिजे..! रविकांत तुपकरांचा लोणीकरांवर तुफान हल्ला….

ravikant tupakar

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) भाजप नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विवादित वक्तव्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. या वक्तव्याचा निषेध करताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत लोणीकरांना जाहीर इशारा दिला आहे.एका व्हिडिओद्वारे बोलताना तुपकर म्हणाले, “शेतकऱ्यांचे उपकार विसरू नका, नाहीतर शेतकरी तुमचं तोंड काळं करतील आणि बुटाने हाणतील.”काय म्हणाले होते लोणीकर?एका कार्यक्रमात बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले होते की, “शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल, हातातील मोबाइल हे सगळं नरेंद्र मोदींमुळे मिळालं आहे.” या विधानामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.शेतकरी नेते रविकांत तुपकरचा बबन लोणीकरांना इशारा!रविकांत तुपकर यांनी व्हिडिओद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की,”लोणीकर साहेब, तुमच्या अंगावरील कपडे, हातातील मोबाईल, आणि पोटात जातं ते अन्न सुद्धा शेतकऱ्यांमुळेच आहे. मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासून शेतकरी कपडे घालत होते. उलट आज सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाली आहे.”ते पुढे म्हणाले, “शेतकरी फुकट खाणारा नाही. तो पिकवतो, कर भरतो आणि त्यातूनच सरकारचा खर्च चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी माफी मागावी. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. त्यांच्या एकाही कार्यक्रमाला शेतकरी उपस्थित राहू देणार नाहीत.”तुपकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं …”तुम्ही लोणीकर असाल, तर मी पण तुपकर आहे – एक पाऊल पुढे आहे! महाराष्ट्रातील शेतकरी आता अशा वक्तव्यांना चोख उत्तर देईल.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!