Advertisement Advertisement

सकाळी साडेदहा वाजता डबा घेऊन घरातून निघाली, साडेबारा वाजता फोन केला तर संपर्कच होईना; बुलढाण्यात तरुणी बेपत्ता!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रुग्णालयात ड्युटीला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना बुलढाणा शहरातील जांभरूण रोड परिसरातील एका कॉलनीत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, तरुणीच्या वडिलांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी एका रुग्णालयात कामाला होती. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिने ड्युटीवर जात असल्याचे सांगितले आणि सोबत जेवणाचा डबा घेऊन नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. मात्र, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिच्या वडिलांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिने फोनला प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर तिचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर तरुणीच्या वडिलांनी १३ नोव्हेंबर रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, बेपत्ता तरुणीचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!