Advertisement Advertisement

वाघूळात दोन पोरांना काठीचा प्रसाद! शिव्या देत बेदम मारहाण; दोघांवर अंढेरा पोलिसांत गुन्हा…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथे दोन मुलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याच्या आरोपावरून अंढेरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघूळ येथील मंदा अशोक बर्डे (वय ३५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलांना योगेश बर्डे आणि गणेश बर्डे यांना आरोपी सचिन रवींद्र काकडे व बाळू रवींद्र काकडे (दोघेही रा. वाघूळ) यांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेनंतर फिर्यादी आपल्या मुलांना घेऊन अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या. त्यानंतर दोन्ही मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. देऊळगाव मही येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना रेफर केल्यानंतर, २७ सप्टेंबर रोजी अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ०३०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय मारुती कायंदे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही गजानन भानुसे यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!