शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) शेगाव बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून सलून चालकावर वस्तऱ्याने हल्ला केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घडली.
जाहिरात ☝️
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश श्रीकृष्ण हिरळकर (वय ४५, रा. सुरभी कॉलनी, शेगाव) हे आपले सलून उघडण्यासाठी आले असता, आरोपी अमोल कैलास खानझोडे (रा. दसरा नगर, शेगाव) हा आपल्या गिऱ्हाईकासोबत वाद घालत होता.
हिरळकर यांनी “वाद का करतोस?” असे विचारताच आरोपीने संतापाच्या भरात शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वस्तऱ्याने हात व पाठीवर वार करून हिरळकर यांना जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी गणेश हिरळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, शेगाव पोलिसांनी आरोपी अमोल खानझोडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 351(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोहेकाँ श्याम आघाव करीत आहेत.











