Advertisement Advertisement

CRIME STORY:तीन दिवसांपूर्वी लग्न झालं, रात्री हनिमून करायच्या दिवशी नवरी सोन घेऊन फरार.. नवरदेव आता येईल नंतर येईल बघता बघता सकाळ झाली…!

मिरा-भाईंदर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): लग्नाच्या नावानं स्वप्न दाखवून वरांना लुबाडणारी चोरटी नवरी आणि तिचा तथाकथित बाप अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. हनिमूनच्या रात्रीच घरातील दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार होणाऱ्या या बाप-लेकीच्या जोडीमुळे अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. काशिमीरा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथील ५३ वर्षीय सेवलकुमार नाडर हे व्यवसायाने इस्टेट एजंट आहेत. त्यांना लग्न करायचे असल्याने आरोपी केसरीमल रांका याने संपर्क साधून मुलगी दाखवली. लग्न लावून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून ४४ हजार रुपये घेतले आणि २२ वर्षीय नेहा अरुण खेडेलवाल उर्फ जन्नत हिच्याशी लग्न लावून दिले.

मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांतच नवरीने डाव साधला. घरातील सुमारे ५ लाख रुपयांचा ऐवज, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन ती फरार झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाडर यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना ताब्यात घेतले. तपासात या टोळीने आतापर्यंत किमान पाच जणांना लग्नाच्या नावाखाली गंडा घातल्याचे समोर आले आहे. संगमनेर, जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती पुढे आली आहे.

ही टोळी विशेषतः उशिरा लग्न करणारे, पत्नी निधन झालेले किंवा विवाहासाठी अडचणीत असलेले पुरुष हेरून त्यांना जाळ्यात ओढत होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!