Advertisement Advertisement

“मास्तरच निघाला रंगेल! बायकोला १४ वर्षांपासून छळ, ‘त्या’ बाईसाठी घरात धिंगाणा”…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेगाव येथील एका नामांकित महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या शिक्षकाने पत्नीला हुंड्यासाठी व स्वतःच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून तब्बल १४ वर्षे शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

चैतन्यवाडी, बुलढाणा येथे राहणाऱ्या सुनीता भगवान सपकाळ (वय ३८) यांचा विवाह २० मे २०११ रोजी भगवान साळूबा सपकाळ (रा. पवारवाडी, शेगाव) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, नंतर पतीने हुंड्याच्या मागणीसाठी सुनीता यांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, आरोपी पतीचे अटाळी येथील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. या संबंधांना सुनीता यांनी विरोध केल्याने त्यांना वारंवार मारहाण करण्यात येत होती. तसेच पती दारूच्या आहारी गेल्याने घरात किरकोळ कारणांवरून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या दाम्पत्यास प्रज्वल व रेयांश अशी दोन मुले आहेत. मुलांच्या भवितव्याचा विचार करून सुनीता यांनी अनेक वर्षे त्रास सहन केला. मात्र, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी छळाची परिसीमा ओलांडल्याने त्यांनी सासर सोडून बुलढाणा येथील माहेरी आश्रय घेतला.

या प्रकरणी सुनीता सपकाळ यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे भगवान साळूबा सपकाळ (पती), गयाबाई साळूबा सपकाळ (सासू), दिलीप साळूबा सपकाळ (दीर), मनीषा दिलीप सपकाळ (जाऊ), रामदास साळूबा सपकाळ तसेच संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव खवले करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!