अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात सोलर प्लांटच्या कामावर असलेल्या जेसीबी ऑपरेटरनं १६ वर्षाच्या पोरीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना २६ फेब्रुवारीला उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळ सोलर प्लांटचं काम सुरू असून त्या कामावर शंकरलाल चिरोजीलाल धुर्वे हे खरेख करत होते. त्याच कामावर जेसीबी मशीन चालवण्यासाठी आरोपी मुकेश शामराव मंझा हा ऑपरेटर म्हणून काम करत होता.
कामाच्या दरम्यान आरोपी हा त्या १६ वर्षाच्या पोरीशी मोबाईलवर बोलू लागला. १० फेब्रुवारीच्या पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास पोरीची आई उठली असता पोरी घरात दिसली नाही. तिनं घरभर शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण पोरीचा कुठेच मागमूस लागला नाही.
दरम्यान, जेसीबी ऑपरेटर मुकेश मंझा हाही कामावरून गायब असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यानं पोरीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोरीच्या वडिलांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी मुकेश मंझा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी आणि पोरीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली वाढवल्या आहेत.














