Advertisement Advertisement

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. कोमल विजेंद्रसिंग बीसे. लखानी चौक, येथील मलकापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी जान्हवी विजेंद्रसिंग बीसेन ४ मार्च रोजी घरातून अचानक बेपत्ता झाली. मुलगी घरी दिसून न आल्याने तिचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

त्यामुळे अज्ञात इसमाने फुस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर मुलीची उंची अंदाजे ५ फूट २ इंच असून रंग गोरा व बांधा सडपातळ आहे. ती घरातून निघताना अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली होती.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अप. नं. १७१/२०२६ कलम १३७ (२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!