Advertisement Advertisement

केळवद शिवारात सापडलेल्या अनोळखी इसमाचा मृत्यू; बुलडाणा परिसरात खळबळ…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) – शहरालगतच्या केळवद शिवारात आढळलेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृताची ओळख पटविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ मार्च रोजी सुमारे ३५ वर्षे वयाचा एक अनोळखी इसम केळवद शिवारात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल केले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.

मात्र, वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने दि. २२ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या इसमाजवळ कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे त्याची ओळख अद्यापही पटलेली नसून, नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, बुलढाणा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, संबंधित इसमाबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!