मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेताच्या धुऱ्यावरून सुरू असलेला वाद चिघळून पिंपळवाडी येथे शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अजय विजय लोखंडे (वय २८, रा. पिंपळवाडी) यांनी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात सामाईक शेताच्या धुऱ्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. २० फेब्रुवारी रोजी पुन्हा धुऱ्याच्या कारणावरून वाद उफाळून आला.
यावेळी आरोपी परमेश्वर जगन्नाथ लोखंडे, योगेश जगन्नाथ लोखंडे व जगन्नाथ एकनाथ लोखंडे (सर्व रा. पिंपळवाडी) यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अंमलदार गणेश देडे यांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीट जमादार सोनकांबळे हे करीत आहेत.














