Advertisement Advertisement

BREAKING:“पेटीचं आमिष दाखवून हात रिकामे! संतापलेल्या गावकऱ्यांनी चिखली–मेहकर रोड केला जाम….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली ते मेहकर रोडवर आज दुपारी अचानक गावकऱ्यांचा संताप उफाळून आला. बांधकाम विभागाच्या वतीने नागरिकांना पेटी वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज पेटी मिळाली नाही, असे सांगत संतप्त नागरिकांनी चिखली–मेहकर हायवेवर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.


मिळालेल्या माहितीनुसार, अनेक नागरिक सकाळपासून पेटी मिळणार या अपेक्षेने थांबले होते. पण दुपारपर्यंतही पेटी वाटप झाले नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटला आणि मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली.
यामुळे चिखली–मेहकर मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!