Advertisement Advertisement

डीजे बंद करा म्हंटल्यावरून गुंज मध्ये तुफान राडा….! शिवजयंतीच्या मिरवणुकीला लागलं गालबोट, चार जण धुळीस मिळाले….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):गुंज गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्यावरून दोन गटात जबरदस्त हाणामारी झाली. ही घटना १९ फेब्रुवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या राड्यात चार जण जखमी झाले असून दोन्ही गटातील एकूण १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गावात शिवजयंतीनिमित्त मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली होती. डीजेच्या दणदणाटात मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर आली. त्यावेळी घरात अॅन्जिओप्लास्टी झालेला रुग्ण असल्याने “इथं डीजे नको वाजवू, पुढं जाऊन वाजवा” अशी विनंती अनिल तुपकर यांनी केली.

मात्र ही विनंती काही युवकांच्या जिव्हारी लागली. त्यांनी जुना राजकीय वाद काढत अनिल तुपकर, त्यांचे वडील मुरहरी तुपकर, आई आणि भावावर काठी व हाताने मारहाण केली. यात मुरहरी तुपकर यांना जबर मार बसला, तर त्यांच्या आईलाही दुखापत झाली.

दरम्यान, दुसऱ्या गटानेही प्रतितक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनिल तुपकर, मुरहरी तुपकर व इतरांनी काठ्यांनी मारहाण केली. यात अक्षय तुपकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण १९ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी सभापती अनिल तुपकर आणि माजी सभापती सुरेश तुपकर यांचाही समावेश आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वीही नाली बांधकामाच्या कारणावरून याच ठिकाणी दोन्ही गटात हाणामारी झाली होती. त्यामुळे जुना वाद अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे.

सध्या साखरखेर्डा परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!