“ब्लाउज शिवायला गेली अन् परतलीच नाही…! रोहण्यात २० वर्षांची तरुणी बेपत्ता….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):
रोहणा गावातील सुमारे २० वर्षांची तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही तरुणी २३ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता ब्लाउज शिवण्यासाठी जात असल्याचे घरच्यांना सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही.


कुटुंबीयांनी रोहणा गाव, खामगाव शहर तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, पण कुठेही तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री साडेनऊच्या सुमारास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी हरविल्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!