बारावीच्या पेपराला निघाला होता पोरगा; मालगणी जवळ ट्रकखाली आला जागीच जीव गेला….!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):आज दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी चिखली-बुलढाणा रोडवर मालगणी जवळ भरधाव ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. सकाळी सुमारे नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेला १८ वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला.

मृत विद्यार्थी शंतनू नारायण अंभोरे (वय १८) हा एकलारा येथील रहिवासी असून तो बारावीच्या परीक्षेसाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही वेळ चिखली-बुलढाणा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. मृतदेह चिखली येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!