बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): NEET परीक्षेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांची तयारी अधिक मजबूत करण्यासाठी PAHEL INSTITUTE, बुलढाणा यांनी पुढाकार घेत “FREE Re-NEET Support” जाहीर केला आहे.
संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी खालील सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत :
- Free Mock Tests
- Free Doubt Solving Sessions
- Detailed Solutions & Guidance
संस्थेचे संचालक प्रा. निखिल श्रीवास्तव यांनी सांगितले की,
“विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांमुळे किंवा परिस्थितीमुळे आत्मविश्वास गमावू नये. योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण तयारीमुळेच यश मिळते. त्यामुळे PAHEL ने सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे.”
या उपक्रमामध्ये PAHEL चे विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थीदेखील सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना “Stand Up and Prepare Confidently” हा संदेश देत संस्था मानसिक आधारासोबतच शैक्षणिक मदतही उपलब्ध करून देत आहे.
नोंदणीसाठी संपर्क :
📞 9763009156 / 9766924900
📍 PAHEL INSTITUTE, चैतन्यवाडी, बुलढाणा
“आपले स्वप्न, आमची जबाबदारी”













