Advertisement Advertisement

फोटो योगायोगाचा की राजकीय प्रयोगाचा? खरात-बनसोडे एकत्र दिसताच बुलढाण्याच्या राजकारणात चर्चांना उधाण..!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात एका छायाचित्राने नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट करत पक्षनिष्ठेची ग्वाही दिली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, त्यानंतर आमदार खरात यांनी सोशल मीडियावर मंत्री संजय बनसोडे यांच्यासोबत विधानभवनात प्रवेश करतानाचे छायाचित्र पोस्ट केले. “मंत्री संजय बनसोडे यांच्यासोबत विधानभवन प्रवेश” असे साधे कॅप्शन असलेल्या या पोस्टमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

या छायाचित्रामागे केवळ योगायोग आहे की बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी, याबाबत विविध स्तरांवर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरही या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय जाणकारांकडून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!