Advertisement Advertisement

आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; डॉ. पंढरी इंगळे यांना ‘ग्लोबल इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ जाहीर…..

चिखली / नाशिक (बुलडाणा कव्हरेज न्युज):महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पंचकर्म तज्ज्ञ डॉ. पंढरी इंगळे यांना “ग्लोबल इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड २०२६” जाहीर झाला असून, त्यांच्या वैद्यकीय, संशोधन व सामाजिक कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.

नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार १० मे २०२६ रोजी गंगापूर रोडवरील मालोजीराव मोगल कॉलेज ऑडिटोरियम येथे प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. इंगळे हे चिखली येथील गंगाई हॉस्पिटल आयुर्वेद पंचकर्म अँड रिसर्च सेंटरचे संचालक असून, त्यांनी आयुर्वेद, पंचकर्म व संशोधनाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना दिलासा दिला आहे. विशेषतः सांधेदुखी, पाठदुखी, स्पाईन विकार, लकवा, स्थूलता व जीवनशैलीजन्य आजारांवर त्यांनी केलेले उपचार प्रभावी ठरले आहेत.

पंचकर्म, योग, प्राणायाम व योग्य आहाराचा समन्वय साधत त्यांनी अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय आराम मिळवून दिला आहे. ग्रामीण भागात कमी खर्चात दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे.

वैद्यकीय सेवेसोबतच आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीम आणि मोफत तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी समाजात आयुर्वेदाबाबत विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील रुग्णही उपचारासाठी चिखलीकडे आकर्षित होत आहेत.

दरम्यान, या पुरस्काराबाबत माहिती देताना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, “समाजोपयोगी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.”

डॉ. पंढरी इंगळे यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!