मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
शहरातील मुकुंद नगर भागात एक खळबळजनक घटना घडली असून, १८ वर्षांची तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे. मुकुंद नगर येथील कु. राजश्री निलेश भोपळे (वय १८ वर्ष २ महिने) ही मुलगी २८ जानेवारीच्या रात्री घरातून कुठे गेली, हे अद्याप कळू शकलेले नाही.
याबाबत तिची आई सौ. करूणा निलेश भोपळे यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, रात्री साधारण १ वाजताच्या सुमारास उठून पाहिले असता राजश्री घरात दिसून आली नाही. त्यानंतर शहरात व नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र ती कुठेच मिळून आली नाही.
या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.बेपत्ता मुलीचे वर्णन पुढीलप्रमाणे … रंग गोरा, चेहरा गोल, काळे डोळे. अंगात कथीया रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची लॅगी, काळ्या रंगाची ओढणी असून पायात स्लीपर चप्पल आहे.
राजश्री बाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.













