बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२१ कोटी ६ लाख रुपये मंजूर झाले. रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दिवाळीपूर्वी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, वासाठी ना. जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.
प्रधानमंत्री पीक विम्यापासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहिले होते. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेडन पीकविम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, असे निर्देश कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ६,२८,८०,५१,५३,९४२. ९१ (सहाशे अठ्ठावीस कोटी, ऐंशी लाख, एकावन्न हजार, पाचशे
त्रेचाळीस रुपये) इतकी नुकसान भरपाई मंजूर (एकूण ४,७६,३९२ शेतकऱ्यांना मंजूर आहे. या मदतीपैकी ४५८०५०७६०५ (तीनशे तीस कोटी, चौपन्न लाख त्र्यांशी हजार नऊशे पंचवीस रुपये) इतकी रक्कम यापूर्वीच ७ लाख ५ हजार २८ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांपैकी ऑक्टोबरमध्ये वाटप होणारी नुकसानभरपाई एकवीस कोटी, पाच लाख, बहात्तर हजार तिनशे एकोणसाठ रुपये मंजूर झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६४ हजार ९४५ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.














