देऊळघाट येथे मोहरम सणानिमित्त शांतता बैठक पार पडली; ठाणेदार गजानन कांबळे यांनी केले मार्गदर्शन

देऊळघाट येथे मोहरम सणानिमित्त शांतता बैठक पार पडली; ठाणेदार गजानन कांबळे यांनी केले मार्गदर्शन

देऊळघाट (अल्ताफ खान- बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोहरम सणानिमित्त शांतता बैठकेचे आयोजन बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले. या बैठकीत गावात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, मोहरम सणानिमित्त निघणारी मिरवणूक शांततेत आणि नियमानुसार पार पाडावी, असे मार्गदर्शन बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी केले.

‘एक पेड मा के नाम’ उपक्रमासह देऊळघाटमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव; सेल्फी पॉइंट ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

ठाणेदार गजानन कांबळे यांनी उपस्थितांना सण साजरा करताना गावातील एकता आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन केले. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिस प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांना पूर्ण सहकार्य आणि सुरक्षेची हमी दिली.

या बैठकीस पोलिस उपनिरीक्षक वानखेडे, गजानन देशमुख, रिजवान खान (राजू), आसिफ मिर्झा, जमादार सुधीर मगर, गोपनीय अंमलदार राजू आघाव, गजानन जाधव, नारायण गौडे, बंडू खरात यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गावातील अनेक नागरिकांनीही या बैठकीत सहभाग घेतला आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मोहरम सण हा गावात दरवर्षी शांततेत आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदाही गावकऱ्यांनी आणि पोलिस प्रशासनाने एकत्रितपणे सणाची तयारी सुरू केली आहे. या बैठकीमुळे गावात सण साजरा करताना शांतता आणि सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!