मुलगी घरी एकटी पाहून, संशियताने अयोग्य वर्तन केल अन् मुलीने आरडाओरड …

STATE NEWS: पाणी पिण्याचा बहाणा करून एका तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्या वर जबरदस्ती….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अयोग्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६० वर्षीय संशयित सुनील बुरड याला अटक केली आहे. स्थानिक महिलांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुनील बुरड हा संशयित एका खासगी कामानिमित्त गावात आला होता. या वेळी पीडित मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिच्याशी अयोग्य वर्तन केले. मुलीने आरडाओरड केल्याने घाबरलेल्या संशयिताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या आवाजाने आजूबाजूच्या महिलांनी धाव घेतली आणि त्याला पकडले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुनील बुरड याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “मुलगी घरी एकटी पाहून, संशियताने अयोग्य वर्तन केल अन् मुलीने आरडाओरड …”

Leave a Comment

WhatsApp Join Group!