मोठी बातमी! बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक लवकरच! प्रभाग रचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, आता ६१ जागांसाठीच निवडणूक निश्चित!

मोठी बातमी! बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक लवकरच! प्रभाग रचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, आता ६१ जागांसाठीच निवडणूक निश्चित!

बुलडाणा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२५ मध्ये चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार, आता राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

१२ जून २०२५ रोजी ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी, ११ जून २०२५ रोजी नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचे निर्देश देण्यात आले होते.

निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा:

  • १४ जुलै २०२५ – प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर
  • २१ जुलै २०२५ – हरकती आणि सूचना सादर करण्याची अंतिम तारीख
  • २८ जुलै २०२५ – जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याची मुदत
  • १९ ऑगस्ट २०२५ – विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णय
  • १८ ऑगस्ट २०२५ – राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करण्याची शेवटची तारीख

यानंतर निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! शेतरस्त्याची आता सातबाऱ्यावर ‘इतर हक्कां’त नोंद; आता बैलगाडीचा नव्हे ट्रॅक्टर जाण्यासाठी ‘या’ कायद्यानुसार मिळणार रस्ता

बुलडाणा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून २ वर्षे उलटली!

बुलडाणा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्येच संपला असून, तेव्हापासून प्रशासकांच्या हातात सत्ता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली होती आणि गटांची संख्या ६० वरून ६८ करण्यात आली होती. मात्र, जून २०२२ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पूर्वीचे निर्णय रद्द करण्यात आले.

६० की ६८? आता जिल्हा परिषदेच्या ६१ जागाच राहणार!

काल (१२ जून २०२५) प्रसिद्ध झालेल्या शासन आदेशानुसार, प्रभाग रचना करताना २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ७५ पेक्षा जास्त आणि ५० पेक्षा कमी नसावी, अशी अटही शासनाने अधोरेखित केली आहे.

त्याचप्रमाणे, २०१७ साली झालेल्या निवडणुकांची रचना विचारात घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा परिषदेसाठी ६१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

काय घडले होते पूर्वी?

  • महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गट वाढवून ६८ केले गेले.
  • जून २०२२ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.
  • ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकरण न्यायालयात गेले.
  • मे २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश: “४ महिन्यांत निवडणुका घ्या!”

रोखठोक

राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठोस पावले उचलली जात आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेसाठी ६१ गटांवर निवडणूक होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदपर्यंतचा निवडणूक रणसंग्राम पुन्हा रंगणार आहे, यात शंका नाही!

Join WhatsApp

Join Now

1 thought on “मोठी बातमी! बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक लवकरच! प्रभाग रचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, आता ६१ जागांसाठीच निवडणूक निश्चित!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!