चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील अन्वी गावात सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात कोणताही कर्मचारी नियमितपणे येत नाही, त्यामुळे रस्त्यावर सांडपाण्याचे मोठे डबके साचत असून दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावातील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना सांडपाण्याची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे असतानाही सरपंचांकडून दुर्लक्षच होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.”साहेब, खरंच आमच्या गावावर लक्ष केंद्रित करा,” अशी भावनिक तोंडी मागणी ग्रामस्थ करत असून, “अन्वी गावाची अवस्था आज आदिवासी भागासारखी झाली आहे.
स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे, रस्ते दुरवस्थेत आहेत. गावाची वाट लागली आहे,” वैभव पवार व गावातील असे ग्रामस्थांनी सांगितले.गावातील सध्याची स्थिती पाहता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सांडपाण्याच्या व्यवस्थेची उपाययोजना करावी, अशी तोंडी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. अन्यथा येत्या काळात आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.












