Advertisement Advertisement

शेतातून घरी येणाऱ्या महिलेची छेडछाड; विरोध करणाऱ्या पतीलाही मारहाण, अंढेरा पोलिसांत गुन्हा…

मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शेतातील काम आटोपून घरी परतत असलेल्या एका विवाहितेचा वाईट उद्देशाने हात पकडून तिला जवळ ओढत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, तसेच तिच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ जुलै रोजी अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहित महिला शेतातील काम आटोपून घरी परतत असताना आरोपी आसिफ सय्यद वाहेद (रा. दिग्रस, ता. देऊळगाव राजा) याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि सोबत येण्यास सांगत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार महिलेने घरी जाऊन आपल्या पतीला सांगितला.

यानंतर संबंधित महिलेचे पती आरोपीला समजावून सांगण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीवरून अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार यांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!