Advertisement Advertisement

“तुझे माझ्या बायको सोबत संबंध आहेत..!” म्हणत चारचौघांत अपमान; आरोपीवर गुन्हा दाखल…..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातल्या पळशी झाशी गावात बदनामी आणि चारचौघांत होणाऱ्या आरोपांना कंटाळून एका ३० वर्षाच्या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशन यांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मृतक अजय रामदास वानखडे याच्यावर रुधाना येथील दीपक उंबरकार हा गेल्या १५ ते २० दिवसांपासून संशय घेत होता. “तुझे माझ्या बायको सोबत अनैतिक संबंध आहेत..!,” असा आरोप करत तो अजयला वारंवार शिवीगाळ करत होता आणि जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा देत होता.

हा वाद मिटवण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी बैठक ठेवली होती. पण बैठकीत सुद्धा आरोपी दीपक उंबरकार यानं अजयला पुन्हा सगळ्यांसमोर अपमानित केलं. या सततच्या बदनामीमुळे आणि मानसिक तणावामुळे अजय फार खचला होता. बैठकीदरम्यानच त्यानं घरात जाऊन टोकाचं पाऊल उचललं.

या प्रकरणी अजयचे नातेवाईक आत्माराम अढाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दीपक उंबरकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करत आहेत.

या घटनेमुळे पळशी झाशी आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, नाहक आरोप आणि बदनामीमुळे एका तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!