Advertisement Advertisement

देऊळघाटमध्ये दहशत…! तलवार दाखवून विद्यार्थ्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी…! जुन्या वादातून शेजाऱ्याचा उन्माद; ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळघाट येथील तायरा कॉलनी परिसरात दहशतीची घटना घडली असून, शेजाऱ्याने थेट तलवार दाखवत एका विद्यार्थ्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार २९ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आला आहे.

या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.तायरा कॉलनीत राहणाऱ्या शबाना अंजुम वसीम बेग या कुटुंबाचा मुलगा अनस बेग शाळेतून घरी परतत असताना, शेजारी राहणारा मोहम्मद अल्तमश मोहम्मद अबरार याने जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले.वादानंतर आरोपी अल्तमश हा थेट तलवार घेऊन परत आला व “तुला जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या शबाना बेग व त्यांच्या सासू जमिलाबी सलीम बेग यांनाही तलवारीने ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आल्याचे नमूद आहे.इतकेच नव्हे तर आरोपीचे वडील मोहम्मद अबरार अब्दुल गफार व आई शाहीन परवीन मोहम्मद अबरार यांनीही फिर्यादी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून जीवितास गंभीर धोका असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.घटनेच्या वेळी नदीम बेग नजीर बेग हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!