शौचास गेलेल्या मुलीला दोन युवकांनी बळजबरीने मक्याच्या शेतात नेऊन…..! दोघांविरुद्ध पोक्सो व अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल….

संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक (शेतखेडा) येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शौचास गेलेल्या मुलीला दोन युवकांनी बळजबरीने मक्याच्या शेतात नेऊन तिचा विनयभंग केला. तसेच या घटनेची कुणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तामगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी ही ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास गावालगतच्या पडीत शेतात शौचास गेली होती. त्यावेळी संदीप सपकाळ यांच्या मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या रोशन संतोष मोहीते (वय १९ वर्षे) व विजय शालीग्राम जाधव (वय २० वर्षे) यांनी तिच्यावर अचानक झडप घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपींनी पीडितेला बळजबरीने शेतात नेऊन तिचा विनयभंग केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, पुन्हा असे कृत्य करू तसेच जीवे मारू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून तामगाव पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७८ (१), ३५१ (२), ३(५), पोक्सो कायद्याचे कलम ८, १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!