समृद्धी महामार्गावर केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात; अंगरक्षकासह तिघे जखमी…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला समृद्धी महामार्गावर मालेगावजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ना. जाधव यांच्या अंगरक्षकासह तिघे जण जखमी झाले असून, कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ही घटना रविवार रात्री घडली.

प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर त्यांची एमएच २८ ००७७ क्रमांकाची कार मेहकरकडे परत येत होती.

कारमध्ये चालक भूषण चोपडे, अंगरक्षक निलेश वाकुडकर आणि सहकारी वैभव देशमुख हे तिघे होते.

दरम्यान, मालेगावजवळ मुंबईकडून येणाऱ्या एका ट्रकने अचानक यू-टर्न घेतला, यामुळे कार व ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!