Advertisement Advertisement

घराच्या जागेच्या वादातून एकाला डोळ्यावर लागले, पाठीवर मारले; शेगावात दोन गटांत मारहाण; सहा जणांवर गुन्हे दाखल….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेगाव शहरातील महात्मा फुले शाळेमागील परिसरात घराच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून शेगाव शहर पोलीस ठाणे येथे दोन्ही बाजूंच्या एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १ मार्च रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास घडली.

फिर्यादी मुस्ताक खान मुमताज खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरासमोर सुरू असलेले शौचालयाचे बांधकाम आरोपींकडून तोडले जात असल्याचे दिसल्याने त्यांनी त्यांना जाब विचारला. यावरून फैयाज खान जहीर खान, आदील खान अब्दुल रजा व हमीद खान अब्दुल रजा यांनी शिवीगाळ करून फावड्याच्या प्लास्टिक दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मुस्ताक खान यांच्या डाव्या हाताच्या दंडावर, पाठीवर तसेच डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले असून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूने आदील खान अब्दुल रजा खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घराच्या बांधकामाच्या कारणावरून त्यांचे मोठे बाबा मुस्ताक खान यांनी शिवीगाळ करून फावड्याच्या प्लास्टिक दांड्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच एजाज खान मुस्ताक खान व शमीनाबी मुस्ताक खान यांनी धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे.

परस्परविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!