अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील मनुबाई गावात कौटुंबिक वादातून एका २४ वर्षीय महिलेला मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना २० ते २२ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सचिन तोडे (वय २४, रा. मनुबाई) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, एक नऊ वर्षांचा मुलगा भाकर मागण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. याच कारणावरून वादाला सुरुवात झाली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी पूजा तोडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्याही दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेमुळे मनुबाई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.











