Advertisement Advertisement

लग्नाला गेले अन् वाद केला; दगड मारून व्यक्ती जखमी! बुलडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील खामगाव रोडवरील शिवकीर्ती मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्नसमारंभात झालेल्या वादातून एका व्यक्तीस दगड मारून जखमी केल्याची घटना बुधवारी (दि.११) सायंकाळी घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील रहिवासी सुभाष रामदास दांदडे (वय ३९) हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी शिवकीर्ती मंगल कार्यालयात उपस्थित होते. यावेळी आरोपी लक्ष्मण पुंडलिक चिंचोले (रा. वरवंड) याच्यासोबत त्यांचा काही कारणावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत दगड मारला.

या घटनेत सुभाष दांदडे यांच्या डाव्या पायाला व पाठीत दुखापत झाली. घटनेनंतर त्यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी लक्ष्मण चिंचोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!