खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :
तालुक्यातील कुंबेफळ येथील २६ वर्षीय युवक प्रतीक रमेश मिरगे हा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
फिर्यादी शुभम गणेश मिरगे (वय २५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक मिरगे हा २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता खामगाव येथे कामावर जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. सायंकाळी उशीर होणार असल्याचा फोन त्याने कुटुंबीयांना केला. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही.
नातेवाईक व ओळखीच्या ठिकाणी शोध घेऊनही प्रतीकचा काहीही पत्ता न लागल्याने अखेर पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एकनाथ खांदे हे करीत आहेत.












