Advertisement Advertisement

जेसीबी चालकाला अडवून काठीने मारहाण; आई-काकूलाही ढकलले…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): एका शेतकऱ्याचा शेतातील पाईपलाईनचे काम करून घराकडे परत येत असलेल्या जेसीबी ड्रायव्हर रस्त्यात अडवून काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना २८ फेब्रुवारी रोजी चिंचखेड शेतशिवारात घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांकडून माहितीनुसार,तो देऊळगाव राजा तालुक्यातील शेळगाव जहागीर येथील शैलेश शरद बंगाळे हे जेसीबी ऑपरेटर म्हणून पाईपलाईनच्या कामावर होते. काम आटोपून ते जेसीबीने घराकडे परत येत असताना चिंचखेड शिवारात आरोपी राजेंद्र रामदास वायाळ याने त्यांची जेसीबी अडवली.

यावेळी आरोपीने चालकाला खाली ओढून शिवीगाळ करत काठीने मारहाण केली तसेच “या रस्त्याने जेसीबी आणली तर जेसीबी जाळून टाकीन,” अशी धमकी दिली.

दरम्यान, मारहाण होत असल्याचे पाहून चालकाची आई व काकू घटनास्थळी धावत आल्या आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही ढकलून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शैलेश बंगाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी राजेंद्र वायाळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अंतर्गत अंढेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!