गौवंशाच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक; ५ अटकेत, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):गोवंश बैलांची कत्तलीसाठी क्रूर व निर्दय पध्दतीने अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चिखली पोलिसानी मोठी कारवाई करत ५ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ६२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीना १ दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड (पीसीआर) मंजूर केला आहे.

ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास बुलढाणा-जालना रोडवरील दांडगे लेआउटसमोर, चिखली येथे उघडकीस आली. याप्रकरणी ओन मदनराजे गायकवाड वय २१, व्यवसाय शेती, रा. पळसखेड दौलत, ता. चिखली यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानुसार,

आरोपी साबीर अहमद अलीम अहमद रा. खानापूर, ता. नकुलजी सारंगापूर, उत्तर प्रदेश, मुक्तार सुलतान कुरेशी रा. जामनेर, जि. जळगाव, मोहम्मद अरशर मोहम्मद तय्यब रा. मालेगाव, जि. नाशिक, शेख असलम शेख कुरेशी रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर व ज्ञानेश्वर संतोष सुरडकर रा. मादणी, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर यांनी संगनमत करून २ आयशर वाहनांमधून गोवंश बैलांची विना

परवाना कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली. या कारवाईत पोलिसांनी आयशर वाहन क्रमांक एमएच. ४३ बी. पी. २५५१ किंमत अंदाजे १० लाख रुपये मधून २७ गोवंश बैल किंमत ५.४० लाख रुपये तसेच आयशर वाहन क्रमांक एमएच ०४ जी. आर.००५३

किंमत अंदाजे १० लाख रुपये) मधून २९ गोवंश बैल किंमत ६ लाख रुपये असा एकूण ५६ गोवंश बैलांसह ३१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(ड), ११(१) (ई), ११(१) (क), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५ (ब), ९, ११ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून चिखली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमाड (पीसीआर) मंजूर केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!