Advertisement Advertisement

BIG BREAKING:भाजपच्या दारात पोहोचलेले राहुल बोंद्रे परत फिरले? पक्षप्रवेशाला ऐनवेळी ब्रेक; राहुल गांधींच्या फोननंतर राजकारणात मोठा ट्विस्ट! सगळं गमावीन, पण शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहीन’! राहुल गांधींशी बोलताना बोंद्रे भावुक…. काय काय बोलले वाचा बातमीत…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखलीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल बोंद्रे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या प्रस्तावित पक्षप्रवेश सोहळ्याला आता अचानक ब्रेक लागल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून समोर आली आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात उद्या दुपारी साडेतीन वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी राहुल बोंद्रे मुंबईला रवाना होणार असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, आता हा पक्षप्रवेश सोहळाच रद्द झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, पक्षप्रवेशाच्या चर्चेदरम्यान एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी काही तास आधी फोनवरून संवाद साधल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या संवादात राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्यावर दबाव येत असल्याचे सांगत, दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच, विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न असल्याचे राहुल गांधी म्हणत असल्याचेही दिसून येते.

या संवादादरम्यान राहुल बोंद्रे भावूक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून ते राहुल गांधी यांच्याशी बोलताना रडत असल्याचेही दिसून येते. “मी सगळं काही गमावेन, पण शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहीन,” असे राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलताना म्हटल्याचे व्हिडिओमधून समोर येत आहे. या फोननंतरच भाजप प्रवेशाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चिखलीच्या राजकारणात चांगलीच रंगली होती. काँग्रेससोबतच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबतही तर्क-वितर्क सुरू झाले होते. मात्र, प्रवेशाच्या काही तास आधीच कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती समोर आल्याने या चर्चांना अचानक वेगळे वळण मिळाले आहे.

आता राहुल बोंद्रे भाजपमध्ये जाणार की काँग्रेससोबतच राहणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पक्षप्रवेश सोहळा रद्द झाल्याबाबत राहुल बोंद्रे किंवा काँग्रेस-भाजपकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!