Advertisement Advertisement

लगीन जमत नाय म्हणून एका २२ वर्षाच्या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं! मलकापूर तालुक्यातील घटना…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माकनेर (ता. मलकापूर) येथील रहिवासी केशव बाबुराव वनारे (वय २२) हा गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी प्रयत्न करत होता. मात्र, अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही विवाह जुळत नसल्याने तो प्रचंड नैराश्यात गेला होता.

याच नैराश्यातून त्याने २९ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास, दारूच्या नशेत माकनेर शिवारातील विहिरीत उडी घेतली. पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी मृताचे चुलत काका विश्वास मधुकर वनारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे करीत आहेत. अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने माकनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!