‘फोटो व्हायरल करतो’ म्हणत पाठलाग; शेगावात १९ वर्षांच्या तरुणावर गंभीर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ १९ वर्षीय युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार २० जून २०२५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पिडित युवतीच्या तक्रारीनुसार आरोपी झायर खान शकील खान (वय १९, रा. आळसणा, ता. शेगाव) याने मागील सात महिन्यांपासून वारंवार फोन करून, ए.आय.द्वारे फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत पाठलाग केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ७४, ७८, ३६२ तसेच एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(w)(i), ३(१)(w), ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!