माळेगाव वडजी येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; धामणगाव बढे पोलिसांत तक्रार…..

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पिंप्री गवळीपासून जवळच असलेल्या माळेगाव वडजी (ता. मोताळा) येथील १८ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


माळेगाव वडजी येथील रहिवासी प्रवीण भानुदास भंगाळे यांनी ५ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची चुलत बहीण कुमारी सायली विनोद भंगाळे (वय १८ वर्षे २ दिवस) ही मलकापूर येथील एम.ई.एस. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून ती दररोज सकाळी ६ वाजता कॉलेजला जात आणि दुपारी ३ वाजता घरी परतत असे. मात्र ५ जानेवारी रोजी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली असता, संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही.


बेपत्ता तरुणीचे वर्णन असे की, ती रंगाने गोरी असून उंची सुमारे ५ फूट आहे. तिने आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस, काळ्या रंगाचा सलवार व लालसर रंगाची ओढणी परिधान केली असून, पायात खाऱ्या रंगाची चप्पल आहे. तिच्याजवळ शाळेची बॅग असून मोबाईल क्रमांक ७६६६४५९७११ आहे; मात्र सदर मोबाईल सध्या स्विच ऑफ आहे.


या घटनेचा तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय जवरे करीत आहेत. सदर तरुणीबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास तात्काळ धामणगाव बढे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!