Advertisement Advertisement

शेती विक्रीच्या नावावर १७ लाखांचा घोटाळा; देऊळगाव राजात दोघांना बेड्या….

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेती विक्रीचे आमिष दाखवून १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देऊळगावराजा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी ३० डिसेंबर रोजी भादंवि कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गारगुंडी येथील गणेश तुकाराम काकड (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आंतरवली सराटी शिवारातील गट क्रमांक १०६ मधील ७० आर शेतजमीन ही सचिन वाल्मीक सांगळे यांच्या नावावर असल्याचे भासवून विक्रीस देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या व्यवहारासाठी फिर्यादीकडून १७ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात सदर शेतजमीन विक्रीस पात्र नसल्याचे समोर आल्याने फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक झाली.

फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर आरोपींनी खोट्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस दाखल करण्याची धमकी दिली तसेच “पैसे मागितले तर पाहून घेऊ” असे म्हणत जीवितास धोका दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून तसेच पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक परविन पटेल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपी वाल्मीक मारोती सांगळे व सचिन वाल्मीक सांगळे (रा. आंतरवली राठी, ता. घनसावंगी, जि. जालना) यांना १३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!