Advertisement Advertisement

दूध उत्पादकांचा एल्गार! चिखलीत २० ऑगस्टपासून दूध विक्री बेमुदत बंद…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पशुखाद्याचे वाढते दर, पशुपालनाचा वाढलेला खर्च आणि त्या तुलनेत दुधाला मिळणारा कमी दर यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. दूध उत्पादकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिखली येथील दूध उत्पादक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, २० ऑगस्टपासून शहरातील दूध विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची माहिती देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १८ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना निवेदन साद केले. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना सध्याचा दूध दर उत्पादकांना परवडत नसल्याने दुग्ध व्यवसाय टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे संघटनेने निवेदनातून स्पष्ट केले.

दूध उत्पादकांची प्रमुख मागणी म्हणजे म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ९० रुपये आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा. पशुखाद्य, चारा, औषधोपचार तसेच पशुपालनासाठी लागणाऱ्या इतर खर्चात वाढ झाली आहे. मात्र, दुधाच्या दरात त्या तुलनेत वाढ होत नसल्याने उत्पादक आर्थिक अडचणीत सापडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

दरवाढीच्या मागणीसाठी आता दूध विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने चिखली शहरातील दूधपुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने दूध उत्पादकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य दर मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

निवेदन देताना दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सह त्यांचे सहकारी दूध उत्पादक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!