Advertisement Advertisement

घर खरेदीच्या वादातून शेतातच काठी-दगडांनी बेदम मारहाण, ‘एकटा भेटला तर कापून टाकतो…?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) पिंपळवाडी गावात घर खरेदीच्या कारणावरून जुना वाद चिघळून थेट शेतातच मारहाणीपर्यंत पोहोचला. दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास शेतात मक्याला पाणी देत असताना अजय विजय लोखंडे (रा. पिंपळवाडी) हा तेथे येऊन शिवीगाळ करू लागला. “काय शिव्या देतोस?” असे विचारताच तो संतापून सरळ अंगावर धावून आला.

तक्रारदाराच्या डाव्या हातावर काठीने प्रहार करत त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर डोक्यावर, गालावर आणि तोंडावर दगडाने मारहाण केली. एवढ्यावर न थांबता पोटात लाथाबुक्यांनीही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. शेतात ट्रॅक्टर चालवणारे विलास हिम्मतराव मिसाळ यांनी धाव घेऊन भांडण सोडवले.

मारहाणीनंतर “पुन्हा शेतात किंवा कुठेही एकटा भेटलास तर कापून टाकतो…?” अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन येथे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!