Advertisement Advertisement

“माझ्या पोराला दारू पाजायला का घेऊन गेला?” किसन नगरात तुफान राडा; पती-पत्नीला ठोकाठोकी, तिघांवर गुन्हा..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :“माझ्या पोराला दारू पाजायला का घेऊन गेला?” या कारणावरून किसन नगर, साबने हायस्कूलजवळ एकदम तुफान भांडण उफाळून आलं. या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली असून दोघंही जखमी झाले आहेत.

या घटनेत संजय शेंडेकर व त्यांच्या पत्नीला मिलींद विजय वास्कर, अश्विन विजय वास्कर आणि सरिता विजय वास्कर यांनी एकत्र येऊन अश्लिल शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. परिसरात काही वेळ मोठा गोंधळ उडाला होता.

याप्रकरणी विजय शेंडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी मिलींद वास्कर, अश्विन वास्कर व सरिता वास्कर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!