Advertisement Advertisement

मजुरीचे उरलेले पैसे मागितल्यावर मजुराला शिवीगाळ अन् मारहाण; जीवे मारण्याची धमकी….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज). : सुरा शिवारात शेतीच्या कामाची उर्वरित मजुरी मागितल्याच्या कारणावरून मजुराला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात ६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता पुंजाराम सरोदे (वय ३५, रा. नागणगाव) यांचे पती बैलांच्या साहाय्याने शेतीची कामे तसेच मजुरी करतात. त्यांनी सुरा येथील अरुण साळवे यांच्या शेतात बैलांच्या मदतीने शेतीचे काम केले होते. या कामाची मजुरी म्हणून आरोपीने त्यांना एक हजार रुपये दिले होते. उर्वरित मजुरी नंतर देतो, असे त्याने सांगितले होते.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी दुपारी सुनिता सरोदे यांचे पती देऊळगाव मही येथे जात असताना त्यांना अरुण साळवे शेतात दिसले. त्यामुळे त्यांनी थांबून पूर्वी केलेल्या कामाची उर्वरित मजुरी मागितली. यावेळी अरुण साळवे यांनी पैसे देण्यास नकार देत त्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी सुनिता सरोदे यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपी अरुण साळवे (रा. सुरा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!