Advertisement Advertisement

पालकमंत्री मकरंद पाटील तीन दिवस बुलढाण्यात; बैठका, दौरे अन् आढाव्यांनी जिल्हा दणाणणार…!

बुलढाणा(जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे गुरुवार, १३ ऑगस्ट ते शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तीन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध बैठका, आढावा तसेच स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहणार आहे.

दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी मुंबई येथून बुलढाणा येथे त्यांचे आगमन होणार असून शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे.

शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अभ्यास गतांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता गुंतवणूक परिषद बैठकीस ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हा परिषद येथे सीईओ संग्राम अभियान पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवरील आढावा बैठकीत ते सहभागी होतील.

सायंकाळी ५.३० वाजता मोताळा येथे स्व. मोबीन अहेमद, माजी जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक सेल यांच्या निवासस्थानी ना. मकरंद पाटील हे सांत्वनपर भेट देणार आहेत. रात्री ८ वाजता बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात नगरपरिषद मोताळा येथील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री मकरंद पाटील उपस्थित राहतील. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या सभेला ते उपस्थित राहणार आहेत.

यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे सातारा येथे प्रयाण करणार आहेत. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज, विविध विकास विषयांवरील आढावा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!