घरगुती वादातून मातेने उचलले टोकाचे पाऊल; दोन चिमुकल्यांचे प्राण….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) लोणार तालुक्यातील वढव गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरातील वादाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलले.

संतापाच्या भरात तिने आपल्या दोन लहान मुलींना गळफास लावला आणि नंतर स्वतःही गळफास घेतला. मात्र गळफास तुटल्याने दोन्ही चिमुकल्या खाली पडल्या आणि त्यांचे प्राण वाचले, तर दुर्दैवाने आईचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव कांचन अमोल सोनुने (वय २५) असे आहे. तिने आपल्या ३ वर्षांची आकांक्षा आणि ६ महिन्यांची प्रांजल या दोन मुलींना गळफास लावला होता. घरातील अँगलला तिघींना लटकवल्यानंतर काही वेळातच मुलींच्या रडण्याचा आवाज बाहेर ऐकू आला.

आवाज ऐकून शेजारी व गावकऱ्यांनी धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला. आतमध्ये पाहिल्यावर अंगावर काटा आणणारे दृश्य दिसून आले. कांचन गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत पडलेली होती, तर दोन्ही मुली खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांच्या गळ्यावर गळफासाचे वळ स्पष्ट दिसत असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. घरगुती वादाचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे वढव गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!