चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली शहरातील बैलजोडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या ४० वर्षीय महिलेने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली.

जाहिरात….👆
मीना राजू महाजन (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरातील इतर सदस्य बाहेर गेल्यानंतर मीना महाजन यांनी खुर्चीच्या सहाय्याने साडी बांधून गळफास घेतल्याची माहिती आहे. काही वेळानंतर शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी घरात पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
महिलेने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.













